गडचिरोली : नक्षल्यांकडून आपल्याच समर्थकाची हत्या

0

 

 

आर्थिक व्यवहार आणि खंडणीच्या वादातून घेतला जीव

 

गडचिरोली Gadchiroli  3 डिसेंबर : गडचिरोली जिल्ह्यातील कोरची पोलिस स्टेशनपासून 14 किलोमीटर अंतरावर असलेल्या मुरकुटी येथे आज, रविवारी सकाळी एका नागरिकाची हत्या झाली. गडचिरोली गोंदिया सीमेवर नामे चमरा मडावी, रा. मुरकुटी यांचा गळा दाबून खून करण्यात आला आहे. मृतक हा कट्टर नक्षल समर्थक होता, मृताची बहीण एमएमसी परिसरातील विस्तार प्लाटून 3 ची माओवादी सदस्य असून डीव्हीसीएमची पत्नी आहे. Gadchiroli: Naxalites killed their own supporter 

 

चमरा मडावीच्या मृतदेहाजवळ एक नक्षल पत्रक सापडले आहे. पत्रकानुसार मृतक पूर्वी नक्षलवाद्यांसाठी काम करत होता पण नंतर तो अनेक कंत्राटदारांकडून नक्षलवाद्यांच्या नावावर पैसे गोळा करत होता. त्याला पोलीस खबरी म्हणूनही ओळखले गेले आहे. नक्षलवाद्यांना राऊंड पुरवण्याच्या प्रयत्नात त्याला गेल्या वर्षी मध्य प्रदेशात बालाघाट येथे अटक करण्यात आली होती आणि काही महिन्यांपूर्वी त्याची तुरुंगातून सुटका झाली होती. या खुनाचा पुढील तपास गडचिरोली पोलीस करत आहेत.