गडचिरोली जिल्हा गौरव पुरस्कार बी.प्रभाकरन यां

0

ना नागपूर -गडचिरोली जिल्ह्याला औद्योगिक नकाशावर आणणारे, कोनसरी येथील लॅायड्स मेटल्स अँड एनर्जी लिमीटेडचे व्यवस्थापकीय संचालक तथा त्रिवेणी अर्थमुव्हर्स प्रा.लि.चे संस्थापक बालसुब्रमण्यम प्रभाकरन यांना यावर्षीच्या गडचिरोली जिल्हा गौरव पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. गडचिरोली प्रेस क्लबच्या वतीने दरवर्षी जिल्ह्यासाठी महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्तीला जिल्हा गौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते. ६ जानेवारी २०२४ रोजी गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात सायंकाळी ६ वाजता होणाऱ्या समारंभात राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम आणि ज्येष्ठ सहकार नेते अरविंद सावकार पोरेड्डीवार यांच्या हस्ते, तथा खासदार अशोक नेते, आ.डॅा.देवराव होळी, आ.कृष्णा गजबे यांच्या प्रमुख उपस्थितीत बी प्रभाकरन यांना पुरस्कार दिला जाणार आहे.
बी.प्रभाकरन यांनी स्थापन केलेली त्रिवेणी अर्थमुव्हर्स ही कंपनी सध्या देशात खाण विकास क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी म्हणून नावारूपाला आली आहे. गेल्या २५ वर्षात त्यांनी भारतासोबतच देशाबाहेरही कार्यक्षेत्र वाढवित ८ हजार लोकांना रोजगार दिला आहे. २०१९ मध्ये प्रभाकरन यांनी सुरजागड लोहखाणीची लिज असलेली लॅायड्स मेटल्स कंपनी आपल्याकडे घेऊन स्टिल निर्मितीच्या उद्योगाला गडचिरोलीत चालना दिली. तामिळनाडू गृहराज्यातून कॅाम्प्युटर सायन्समध्ये अभियांत्रिकी पदवीधर असलेले प्रभाकरन हे उत्कृष्ट पायलटही आहेत हे विशेष.