एम एच -सीइटी साठी 29 ला निःशुल्क सराव परीक्षा

0

युवा सेने तर्फे विद्यार्थी हितार्थ उपक्रम

वाडी(प्रतिनिधी) इयत्ता 11,12 वी मध्ये अध्ययनरत विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी व अन्य व्यावसायिक अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यापूर्वी महाराष्ट्र शासनाची सीईटी प्रवेश परीक्षा आवश्यक असते.त्यात ही परीक्षा ऑन लाईन पध्दतीने संपन्न होते त्या मुळे या परीक्षेचा सराव व्हावा या उद्देशाने युवा सेने तर्फे राज्य भर येत्या 29 मार्च शनिवार ला निःशुल्क ऑन लाईन सराव परीक्षा आयोजित करण्यात आली आहे.

या संदर्भात युवा सेनेचे राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य हर्षल काकडे यांनी सांगितले की युवा सेनेतर्फे विद्यार्थी हितार्थ आयोजित राज्यातील सर्व तालुक्यात निःशुल्क सराव परीक्षा आयोजन अंतर्गत हिंगणा विधानसभा क्षेत्रात वाडी परिसरातील इन्फंट कॉन्व्हेंट विकास नगर खडगाव मार्ग या शाळेत या निशुल्क सराव परीक्षेचे परीक्षा केंद्र निश्चित करण्यात आले आहे. या सराव परीक्षेत सहभागी होण्यासाठी http://yuvasenacet.com या संकेत स्थळावर इच्छुक विद्यार्थ्यांनी नोंदणी करावी. विद्यार्थ्यांसह पालक, शिक्षकांनी देखील याबाबतीत सहकार्य करावे.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना या परीक्षे संदर्भात वेळेवर योग्य मार्गदर्शन मिळत नाही . अनुभवा चया अभावी त्यांना परीक्षेच्या वेळी अनेक अडचणींना सामना करावा लागतो. ही बाब लक्षात घेता युवासेने ने अकरावी ,बारावीच्या विद्यार्थ्यांना अनुभवासाठी ही संधी उपलब्ध करून दिली आहे. निश्चितच या निःशुल्क सराव परीक्षेचा विद्यार्थ्यांना लाभ होईल असे मत व्यक्त करून युवासेना राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य हर्षल काकडे यांनी विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे