

छत्रपती शिवाजी नगर (Chhatrapati Shivaji Nagar)-अनेक खासदारांचे तिकीट कापले आता जे पुढचे चाळीस गद्दार आहेत त्यांनी सुद्धा विधानसभेत विचार करावा की आपले काय होईल, कारण आता विकेट पडायला सुरुवात झाली आहे असा हल्ला माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी चढविला. शिवसेना शिंदे गटातील खासदारांचे तिकीट कापले. ज्यांना अनेक वेळा खासदार शिवसेनेने उद्धव ठाकरेंनी खासदार बनवले, त्यामध्ये एक व्यक्ती अशी आहे की ज्यांना पाच वेळा खासदार बनवले आणि त्यांना आता दहा तास उभे राहून सुद्धा तिकीट मिळाले नाही.
अजून दोन-तीन जणं आहेत ज्यांची तिकीटं कापली जाणार आहेत. शेवटी भाजपसोबत जाऊन मिळवलं तरी काय ?- गद्दारी उद्धव ठाकरेंसोबत केली, महाराष्ट्रासोबत बेईमानी केलेली आहे.-आपण पाहिलेत की त्यांनी एक वेळेस सांगितले होते की एकही उमेदवार पडला तर राजीनामा देईल. त्यांना ते तिकीट पण देऊ शकत नाहीत असे हाल त्यांचे सध्या आता सुरू आहेत असा टोला मुख्यमंत्र्यांचे नाव न घेता लगावला.
महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आपण पाहत असाल राष्ट्रवादी मिंधे गट आणि भाजपाला उमेदवार मिळतच नाहीत. भाजपाने दोन उमेदवार जाहीर केले आहेत तेही मुंबई विरोधी आणि महाराष्ट्र विरोधी आहेत असेही आदित्य ठाकरे म्हणाले.