

ठाणे(Thane)११ जून :-भिवंडीच्या सरवली एमआयडीसीमधील सदाशिव हायजिन प्रायव्हेट लिमिटेड (HYGIENE PRIVATE LIMITED) या डायपर बनवणाऱ्या कंपनीला पहाटेच्या सुमारास आग लागली. या घटनेत तीन मजली इमारत पूर्णपणे जळून खाक झाली आहे. या आगीमुळे परिसरात काळ्याकुट्ट धुराचे लोट पसरल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.सुदैवाने अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.पण आग मोठ्या प्रमाणावर लागली असल्याने इमारतीचे तीन मजले जळून खाक झाले आहेत. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे कर्मचारी प्रयत्नात आहे. मात्र आग शमवण्यासाठी आणखी काही वेळ जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.