कोळसा खाण प्रकरणात काँग्रेसचे माजी खासदार विजय दर्डा दोषी

0

नवी दिल्ली New Delhi–  छत्तीसगडमधील कोळसा खाण वाटपप्रकरणी काँग्रेसचे माजी खासदार विजय दर्डा यांच्यासह सहा आरोपी या प्रकरणात दोषी ठरले आहेत. दिल्लीच्या विशेष न्यायालयाने हा निकाल दिलाय. या निकालानंतर १८ जुलै रोजी आरोपींना शिक्षा सुनावली जाणार आहे. कलम १२० ब आणि ४२० अंतर्गत ते दोषी ठरले आहेत. माजी खासदार विजय दर्डा यांच्यासह त्यांचा मुलगा देवेंद्र दर्डा,माजी कोळसा सचिव एच.सी. गुप्ता, के एस क्रोफा, के.सी. सामरिया तसेच जेलडी यवतमाळ एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक मनोज जयस्वाल यांनाही न्यायालयाने दोषी ठरवले आहे.- Six accused, including former Congress MP Vijay Darda, have been convicted in the case of allocation of coal mines in Chhattisgarh. The special court of Delhi has given this verdict. After this verdict, the accused will be sentenced on July 18. He has been convicted under Section 120 B and 420. Former MP Vijay Darda along with his son Devendra Darda, former Coal Secretary H.C. Gupta, KS Krofa, K.C. Samaria and Jeldi Yavatmal Energy Pvt Ltd director Manoj Jaiswal have also been convicted by the court. 

सीबीआयला या प्रकरणात पुरावे सादर करण्यात यश आल्याचा निर्वाळाही न्यायालयाने दिला आहे. न्यायालयाने नोव्हेंबर २०१४ मध्ये सादर झालेला क्लोझर रिपोर्ट फेटाळून लावला होता व या प्रकरणात आणखी तपास करण्याचे निर्देश सीबीआयला दिले होते. तत्कालीन खासदार दर्डा यांनी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांना पाठविलेल्या पत्रात विपर्यस्त माहिती मांडल्याचा ठपका त्यांच्यावर होता. त्यावेळी कोळसा मंत्रालयाची जबाबदारी मनमोहनसिंग यांच्याकडेच होती. जेलडी यवतमाळ एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडसाठी छत्तीसगडमधील फतेहपूर कोळसा ब्लॉक मिळविण्यासाठी हा खटाटोप केल्याचे न्यायालयाने नमूद केले.