इतिहासात पहिल्यांदाच नक्षलवाद्याचे मतदान

0

नागपूर (Nagpur):- बंदुकीच्या नळीच्या बळावर क्रांती घडवून आणण्याचा उद्देश असलेल्या नक्षलवाद्यांचा लोकशाहीवर विश्वास नाही. आणि ते कधी निवडणुकीत सहभागी होत नाही. मात्र अलीकडे त्यांच्यामध्ये परिवर्तन होत असून,सरकारबद्दल विश्वास वाढत चालला आहे.. म्हणूनच की काय एका जहाल माओवाद्याने लोकशाहीच्या या उत्सवात सहभागी होत ,प्रथमच मतदान केले आहे.

सुकलु पुनेम हा पंचवीसीतील तरुण मुळचा बिजापूर (छत्तीसगड)जिल्ह्यातील गंगानूर येथील रहिवासी.. तो २०१३मध्ये नक्षल चळवळीत सहभागी झाला. क्रांतिकारी बाण्यामुळे वरिष्ठ माओवाद्यांचा जवळचा झाला आणि त्याची नेमणूक माओवाद्याचे हाडकोअर दलम असलेल्या प्लाटून दलमचा कमांडरपदी करण्यात आली.सदर प्लाटून दलम ,नक्षल्यांचे महाराष्ट्र, मध्यप्रदेश, छत्तीसगड (एम एम सी)झोन क्षेत्र असलेल्या एरिया मध्ये कार्यरत आहे. सुकलु २०१४-२०१५ मध्ये गोंदिया जिल्ह्यातील दरेकसा भागात सक्रीय होता. तेथून त्याला छत्तीसगड मध्ये पाठविण्यात आले.तेथे नक्षल्यांच्या हिंसक कारवायाना फारच त्रासला.दरम्यान गोंदिया जिल्ह्यातील पोलिसांच्या नक्षल सेलच्या संपर्कात आला आणि त्याने आगष्ट २०२४ मध्ये गोंदिया पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले.आता तो गोंदिया येथे वास्तव्यास .त्याने आतापर्यंत कधीही मतदान केले नाही. मतदान कशासाठी करायचे याची सुध्दा त्याला माहिती नाही.

विधान सभा निवडणुकीची धामधूम सुरू झाल्यानंतर,लोकांच्या तोंडून त्याने निवडणुकीविषयी चर्चा ऐकली आणि या उत्सवात सहभागी होण्याची उत्सुकता लागली.परंतु त्याचेकडे कोणतेही कागदपत्र नसल्याने, त्याला मतदार होता येत नव्हते. नंतर पोलिसांच्या मदतीने कागदपत्रांची जुळवाजुळव करून, तो गोंदियाचा मतदार झाला आणि बुधवारी त्याने प्रथमच गोंदिया येथे मतदान केले.बूलेट वर विश्वास ठेवणाऱ्या माओवाद्यांचा अलिकडे बँलेटवर विश्वास वाढतो की काय?असेच म्हणावे लागेल.