चांद्रयान- ३ सा ठी अजित पवार गट राष्ट्रवादीचे टेकडी गणेशाला साकडे

0

 

नागपूर  NAGPUR :  चांद्रयान- ३  Chandrayaan-3 मोहीम आज यशस्वी व्हावी याकरिता देशभरातील नागरिक प्रार्थना करत आहेत. नागपूर येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटातर्फे टेकडी गणेश GANESH TEKADI

मंदिरात विशेष पूजा आयोजित करण्यात आली. होम हवन देखील करण्यात आले. भारतीय शास्त्रज्ञानी चांद्रयान मोहिमेसाठी प्रचंड मेहनत घेतली आहे, त्यामुळे संपूर्ण जगाचं लक्ष चांद्रयान मोहिमेकडं लागलं आहे. भारत देश जरी विज्ञान क्षेत्रात भरारी घेत असला तरी चांद्रयान मोहीम यशस्वी व्हावी यासाठी देशवासियांच्या भावनेची धार्मिक जोड आज दिसत आहे. त्यामुळे हे मिशन पूर्ण होईल आणि भारत चंद्रावर तिरंगा झेंडा रोवेल असा विश्वास राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रशांत पवार, प्रवक्ते,बाबा गुजर नागपूर जिल्हाध्यक्ष यांनी व्यक्त केला.