
नागपूर – भारतीय राज्यघटनेचे जनक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपुरात बौद्ध धम्म स्वीकारला. बाबासाहेबांसोबतच त्यांच्या लाखो अनुयायांनीही यावेळी बौद्ध धम्म स्वीकारला. म्हणूनच 14 ऑक्टोबरच्या दिवशी बाबासाहेबांचे हजारो अनुयायी नागपुरात दीक्षाभूमी येथे तथागत गौतम बुद्ध आणि बाबासाहेब आंबेडकर यांना नमन करून बौद्ध धर्माची दीक्षा घेतात. आज 67 धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा केला जात असून सकाळपासून हजारोंच्या संख्येने बाबासाहेबांचे अनुयायी दीक्षाभूमी येथे आले आहेत.