
बाबासाहेब आंबेडकर कन्वेंशन सेंटर येथे लोककला महोत्सव थाटात
बाबासाहेब कन्वेंशन सेंटर येथे रविवारी लोककला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी कार्यक्रमाचे अध्यक्ष शाहीर अलंकार टेंभुर्णे यांनी महापुरुषांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन केले. लोककलेचे जतन व संवर्धन व्हावे हाच एकमेव दात उद्देश ठेवून लोककला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते .लोककला हीच आपली खरी संस्कृती आहे व यातूनच सुसंस्कृत समाज घडवायची आहे. लोककला म्हणजे लोकांनी लोकांकरता लोकांकडून निर्माण केलेली कला म्हणजे लोककला होय. आपल्या संत व महापुरुषांनी सुद्धा ह्याच लोककलेच्या माध्यमातून समाज प्रबोधन करून अनिष्ट रूढी परंपरा यावर जोरदार हल्ला चढविला आहे व समाजाला एक चांगला व सनमार्ग दाखविला आहे, असे ते म्हणाले.
कार्यक्रमादरम्यान शाहीर टेंभुर्णे गुरुजी सार्वजनिक वाचनालयतर्फे व मॉइल इंडिया लिमिटेड काटोल रोड द्वारा प्रायोजित ढोलकीच्या तालावर व घुंगराच्या बोलावर या कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात आले .जय भीम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती रामटेक तर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवास आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मानवंदना द देण्यात आली. तर दि लॉर्ड अशोका बॅकवर्ड मल्टीपर्पस सोसायटी तर्फे लोककलेचा दरबार भरवला. तसेच चैताली भजन दंडार मंडळ यांनी दंडार सादर केली तर शारदा बहुउद्देशीय महिला मंडळ यांनी लोकनृत्य सादर केले त्याचप्रमाणे करंट झाडीपट्टी कलाकार संस्था यांनीलोककलेचा जलसा यावर कार्यक्रम सादर केले तर शेवटी संत गाडगे बाबा ग्रामस्थ संस्था नरखेड यांनी लोककलेला मुजरा करून कार्यक्रमाची सांगता केली
शेवटी संस्थेचे अध्यक्ष अलंकार टेंभुर्णे यांनी सर्व संस्थांचे व कलाकारांचे आभार व्यक्त केले .जय भीम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती रामटेक शाहीर टेंभुर्णी सार्वजनिक वाचनालय रामटेक अशोका बॅकवर्ड मल्टीपर्पस सोसायटी रामटेक यांनी आयोजनाची मुख्य भूमिका बजावली.
















