महाराष्‍ट्र दिनानिमित्‍त 1 मे रोजी ‘लोककलांचा उत्‍सव’

0

नागपूर (NAGPUR), 29 एप्रिल 2025 –
महाराष्‍ट्र दिनाचे औचित्‍य साधून गुरुवार, 1 मे 2025 रोजी महाराष्‍ट्रातील ‘लोककलांचा उत्‍सव’ व्‍हीआर, मेडीकल चौक येथे आयोजित करण्‍यात आला आहे. महाराष्‍ट्र प्रदेशाची कला, परंपरा आणि इतिहास लोकनृत्‍य व लोकनाट्याच्‍या माध्‍यमातून प्रस्‍तुत केले जाणार आहे.

मुंबईतील प्रसिद्ध लोकनृत्य मंडळाद्वारे मौखिक परंपरा ओवी, पारंपरिक वासुदेव, गोंधळ, लावणी, कोळी नृत्‍य, दिंडी या नृत्‍यांसह शेतकरी व छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्‍याभिषेकाचे नाट्यमय सादरीकरण केले जाणार आहे. सांस्कृतिक कार्यक्रमांव्यतिरिक्त, पैठणी साडी ड्रॉप-डाउन, रांगोळी, लोकसंगीत, पारंपारिक खाद्यपदार्थांचे स्टॉल्स येथे बघायला मिळतील.