सांस्कृतिक कार्य विभागामार्फत लोककला संस्कृती कार्यशाळेचे आयोजन

0

नागपूर (nagpur), 30 मार्च

सांस्कृतिक कार्य विभागामार्फत संपूर्ण राज्यभर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहेत. महाराष्‍ट्राला मोठी लोकपरंपरा लाभलेली असून खडीगमत, झाडीपट्टी नाट्य, डंडार, गंगासागर, दशावतार यासारख्‍या लोककला या केवळ मनोरंजनाचे साधन नसून लोकप्रबोधनाचे साधन देखील आहेत. या लोकपरंपरा म्‍हणजे समाज घडवण्‍याची मोठी प्रक्रिया आहे, असे प्रतिपादन मान्यवरांनी केले.

राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री श्री आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून विभागाचे अपर मुख्य सचिव श्री विकास खारगे व संचालक श्री विभीषण चवरे यांच्या नियोजनाखाली लोककला संस्कृती कार्यशाळा ही सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई आणि ललित कला विभाग, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुनानक भवन येथे आयोजित करण्‍यात आली आहे. या कार्यशाळेचे रविवारी थाटात उद्घाटन झाले. मंचावर ज्‍येष्‍ठ नाट्य दिग्‍दर्शक व अॅग्रो थिएटरचे संस्‍थापक हरीश इथापे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्रा. डॉ. पायल ठवरे, ललित कला विभाग प्रमुख डॉ. संयुक्‍ता थोरात, कीर्तन विषयाचे अभ्‍यासक पियुष धुमकेकर, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे कुलदीप कोवे यांची प्रमुख उपस्‍थ‍िती होती.

कार्यशाळेचे प्रमुख मार्गदर्शक असलेल्‍या हरीश इथापे यांनी आपल्‍या भाषणातून ‘लोककला आणि प्रायोगिक रंगभूमी’ यावर प्रकाश टाकला. तर डॉ. पायल ठवरे यांनी भारतीय संविधानात लोकपरंपरेचे खूप महत्‍त्‍व दिले गेले असल्‍याचे सांगितले. डॉ. संयुक्ता थोरात यांनी ‘नाट्यशास्त्र आणि लोकरंगभूमी’ यावर मार्गदर्शन करताना आपल्‍या लोककला, लोकपरंपरा लुप्‍त होत चालल्‍या असून त्‍यांचे संवर्धन करण्‍यासाठी सांस्‍कृतिक मंत्रालयाद्वारे असे विविध उपक्रम राबवले जात असल्‍याचे सांगितले. सचिन दाभनेकर यांनी महाराष्‍ट्रातील विविध लोकनृत्‍य प्रकार प्रात्‍यक्षिकासह समजावून सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैदेही चवरे यांनी केले.

या कार्यशाळेला रंगभूमी, लोककला आणि कीर्तनाच्या अभ्यासकांचा उत्तम प्रतिसाद लाभला. विद्यार्थ्यांसह नाट्यकर्मी, कलाकार आणि रसिक प्रेक्षकांनी या चर्चासत्रात उत्स्फूर्त सहभाग घेतला. जास्तीत जास्त तरुणांनी