अकोल्यात ‘जेएन.१’ व्हेरिएंटचा पहिला रुग्ण, प्रकृती स्थिर

0

 

नागपूर – राज्यात ‘जेएन.१’ व्हेरिएंटचे रुग्ण वाढत आहेत. अकोल्यात कोरोनाचा सब व्हेरिएंट ‘जेएन.१’ चा पहिला रुग्ण आढळला आहे. हा रुग्ण शहरातील असून सध्या त्यांची प्रकृती ठीक असल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले. अकोला शहरातील त्या रुग्णाला बाहेरगावी जायचे होते, त्यासाठी त्यांना लक्झरी वाल्यांनी कोरोना टेस्ट करण्यास सांगितले. त्याची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने त्याला क्वॉरंटाइन करण्यात आले होते. त्यासोबतचं त्याच्या कुटुंबाची कोरोना चाचणी करण्यात आली आणि ते सर्व निगेटिव्ह आले आहेत. तर रुग्ण हा शहरातील असून रुग्णाचे नमुने पुणे येथील सह्याद्री रुग्णालयाकडे पाठवण्यात आले. तपासणीत रुग्णात ‘जेएन.१’ व्हेरियंट विषाणू आढळला असल्याचा अहवाल प्राप्त झाला पण रुग्णाने वेळेत उपचार घेतल्याने सध्या रुग्णाची प्रकृती ठीक असून त्याच्या कुटुंबात कोणीही पॉझिटिव्ह नसल्याने सध्या जिल्ह्यात किंवा शहरात एकही ‘जेएन.१’ व्हेरियंटचा रुग्ण नसल्याचं महानगरपालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर अनुप चौधरी यांनी सांगितले.