आठ महिन्यानंतर पहिला कोरोना रुग्ण

0

 

(Amravti)अमरावती – अमरावती जिल्ह्यात तब्बल आठ महिन्यानंतर एका
कोरोनाग्रस्ताची नोंद झालेली आहे. हा 21 वर्षीय तरुण अमरावतीच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दाखल होता.
त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात 5 मे 2023 नंतर पहिल्यांदा कोरोना रुग्ण नोंद झालेली आहे. हा तरुण अचलपूर तालुक्यातील धामणगाव गडी येथील रहिवाशी आहे. अन्य आजारासाठी तो सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दाखल होता.

कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वॉर्ड क्रं.10 मध्ये उपचार सुरु आहेत. रुग्णालयात चाचण्या वाढवण्यात आल्या आहेत.
नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी खबरदारी घेण्याचे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे, जिल्हा शल्य चिकित्सक यांनी केले आहे.