मनसेच्या कामगार सेनेच्या जिल्हाध्यक्षांवर गोळीबार

0

चंद्रपूर(Chandrapur) 7 जुलै :- शहरातील स्थानिक रघुवंशी कॉम्प्लेक्स येथे महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार(Aman Andhewar) यांच्यावर अज्ञात व्यक्तीने केलेल्या गोळीबार प्रकरणी २ आरोपींना नागपुरातून ताब्यात घेतले आहे.

शहराच्या मध्यभागी स्थानिक आझाद बगीच्यालगत रघुवंशी कॉम्प्लेक्समध्ये मनसेच्या कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार हे कार्यालयात जाण्यासाठी या इमारतीच्या लिफ्टजवळ आले असता लिफ्टचा दरवाजा उघडण्यापूर्वीच त्यांच्या मागून आलेल्या एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्यवर गोळीबार केला होता. सदर व्यक्तीने बंदुकीतून दोन फायर केल्या. त्यातील एक गोळी अंधेवार यांना चाटून गेली, तर दुसरी गोळी त्यांच्या पाठीला लागली. त्यात ते जखमी झाले. प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना नागपूर येथे हलविण्यात आले.आता त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असून स्थिर आहे.

पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रपूर, बल्लारपूर,घुग्गुस,स्थानिक गुन्हे शाखा अशी १० वेगवेगळी चौकशी पथके तयार करण्यात आली असून तपासाची चक्रे वेगाने फिरू लागलेली आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी ही पथके तपास करीत आहेत. गोळीबार प्रकरणी २ आरोपींना नागपुरातून ताब्यात घेतले आहे. दोघानाही अटक करण्याचे संकेत पोलीस सूत्रांनी दिले.