

गुरुवारी रात्रीची घटना
कोल्हापूर (Kolhapur) :- कोल्हापूर शहराचा सांस्कृतिक वैभवला गुरुवारी धक्का बसला. शहरातील ऐतिहासिक संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह अग्नीतांडवामुळे जळून खाक झाले. शंभर वर्षांची परंपरा असलेले नाट्यगृह जळून खाक होताना पाहून अनेक अभिनेत्यांना आश्रू अनावर झाले. अनेक अजरामर नाटके अन् असंख्य कलाकार घडवणारे हे नाटयगृह जळताना कलाकारांना त्यांचा आश्रूंचा बांध रोखता आला नाही. त्यातून सावरत नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीसाठी राज्यभरातील रंगकर्मींनी पुढाकार घेतला आहे. या आगीत केशवराव भोसले नाट्यगृहातील सर्व साहित्य जळून खाक झाले आहे. राजश्री शाहू महाराजांनी हे नाट्यगृह बांधून दिले होते.
कोल्हापुरातील राजर्षी शाहू महाराज (Rajarshi Shahu Maharaj) यांच्या पुढाकाराने केशवराव भोसले हे नाट्यगृह उभारण्यात आलं होतं. शंभर वर्षांची परंपरा असलेले नाट्यगृह जळून खाक झाल्याचे पाहून अभिनेत्यांना आपले आश्रू अनावर झाले आहे. ही आग कोणत्या कारणाने लागली. याची अधिकृत माहिती अद्याप समोर आली नाही. मात्र केशवराव भोसले नाट्यगृहात असलेल्या गॅस पाईप लिकेज होऊन ही आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. 9 ऑगस्ट रोजी केशवराव भोसले यांची जयंती होती. त्याच्या पूर्वसंध्येला ही आगीची घटना घडली. ही भीषण आग लागल्याने आणि आगीच्या भडक्यामुळे त्या ठिकाणी आता सभागृहाचा फक्त सांगडाच राहिला आहे. दरम्यान, या नाट्यगृहाच्या १०० मीटर परिसरात सामान्य नागरिकांना बंदी घालण्या आली आहे.