

suicide of a family in Nagpur
नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील मोवाड गावात एकच कुटुंबातील चार जणांचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह सापडून खळबळ उडाली आहे. निवृत्त शिक्षक विजय पचौरी (62), त्यांची पत्नी माला (54) आणि मुले दीपक (40) व गणेश (37) असे मृतक आहेत.
सकाळी सातच्या सुमारास शेजाऱ्यांना ही घटना लक्षात आली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांना एक आत्महत्या पत्र सापडले असून, तीन मृतदेहाचे हात पाठीमागे बांधून लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने या प्रकरणाला गूढ रंग प्राप्त झाला आहे.
पोलिस तपासात असे दिसून आले आहे की, मृतकांपैकी एक मुलगा मध्य प्रदेशातील पांढूर्णा येथे आर्थिक घोटाळ्यातील आरोपी होता आणि नुकताच जमीनावर आला होता. कुटुंबात आर्थिक तंगी आणि या मुद्यावरून वाद झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पोलिसांचा संशय
पोलिसांच्या मते, वडिलांनीच इतर तीन जणांची हत्या केली असावे आणि नंतर स्वतः गळफास घेतला असावा. तीन मृतदेहाचे हात पाठीमागे बांधलेले असणे हा या दिशेनेचा एक पुरावा मानला जात आहे. पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. आत्महत्या पत्र, घटनास्थळाचा पंचनामा आणि मृतकांच्या कुटुंबीय आणि मित्रांचे जबाब नोंदवले जात आहेत. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होईल.