
(Ambhora Bridge)बांधकाम पूर्ण झाले तरी रहदारी करीता खुला करण्यात येत नव्हता, अशा अंभोरा येथील पुलावरून रहदारीला अखेर मान्यता प्रदान करण्यात आली आहे.
खरंतर या पुलाचे बांधकाम आधीच पूर्ण झाले आहे. परंतु हा पूल वाहतुकीसाठी खुला केला जात नव्हता. वारंवार पाठपुरावा केल्यानंतरही अधिकारी व यंत्रणा या बाबीकडे कानाडोळा करत असल्यामुळे 1 मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून (Subhash Ajabale)सुभाष आजबले, (Puja Thawkar)पुजा ठवकर, (Praveen Udapure) प्रवीण उदापुरे, (Kavita Uike)कविता उइके, (Kajal chawle)काजल चवले, (Seema Ramteke)सीमा रामटेके,(Raju Meshram)राजु मेश्राम, (Swapnil Arikar)स्वप्नील आरीकर, (Radhe Bhongade)राधे भोंगाडे, (Raju Halmare)राजु हलमारे, (Vaman Shahare)वामन शहारे,(Satish Sarve)शतीस सार्वे,(Kiran Chavle)किरण चवळे आणि परीसरातील शेकडो लोकांनी आंदोलन केले.
टेस्टिंग पूर्ण झाली की, पूल रहदारीसाठी खुला करण्याचे आश्वासन अधिकारी व यंत्रणेकडून देण्यात आले होते.
टेस्टिंग होऊन दोन महिने लोटले परंतु पूल रहदारीसाठी खुला करण्यात येत नसल्याने लोकांची होणारी कोंडी लक्षात घेऊन दिनांक 25 जुलै पासून नागपूर बांधकाम विभाग व आंभोरा पुलावर आमरण उपोषण करण्याचे पत्र नितीन गडकरी, भंडारा व नागपूर जिल्हाधिकारी, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग नागपूर यांना देण्यात आले.
तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेऊन पायदळ, सायकल व मोटारसायकलने रहदारी करण्यासाठी पूल सुरु करण्यात आला आहे. पुलावर रहदारी सुरु झाली असली तरी, काही कामे अद्याप सुरु असल्याने पुलाचा उपयोग जाण्या येण्यासाठीच करावा. सेल्फी किंवा पर्यटन म्हणून करण्यात येऊ नये असे आवासन सुभाष आजबले यांनी केला आहे