
नाशिक – पुणे-नाशिक महामार्गावर नाशिक ते पुणे जाणारी लेनवर मल्हारवाडी Malharwadi on the Nashik to Pune lane on the Pune-Nashik highway शिवारात 19 मैल येथे एसटी बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला असून एकजण जागीच ठार झाला. पंक्चर झालेली बस महामार्गावर उभी असताना पाठीमागून येणाऱ्या ट्रकने बसला धडक दिली. त्यावेळी एसटी चालक गाडीखाली जॅक लावत होते. त्यामुळे गंभीर जखमी अवस्थेत त्यांना उपचारासाठी दुसऱ्या एसटी बसमधून दवाखान्यात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. ट्रक चालकाला खाजगी ॲम्बुलन्सने सोनवणे हॉस्पिटल आळेफाटा येथे दाखल केले. सदर अपघातग्रस्त वाहन क्रेनच्या साहाय्याने रस्त्याच्या बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे.
Related posts:
म.न.पामध्ये मोठा घोटाळा! निवासी भूखंडावर बहुमजली हॉस्पिटलचे बांधकाम मंजूर
October 31, 2025Breaking news
रेलवे पुलिस की तत्परता से महिला यात्री को मिला खोया हुआ बैग
October 25, 2025MAHARASHTRA
कळमेश्वर गोंडखैरी उड्डाणपूलास मंजुरी-डॉ. राजीव पोतदार यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश
October 23, 2025MAHARASHTRA















