शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा

0

 

गोंदिया: मृग नक्षत्र लागून 10 दिवसाचा कालावधी होत असून आताही उन्हाचा तडाखा कायम आहे . मात्र काही दिवसात पावसाळा सुरू होणार असून शेतकरी सुद्धा आपल्या शेतीच्या कामासाठी लागलेला असल्याचे पाहावयास मिळते. शेतकऱ्यांनी आपल्या शेतात पहिल्यांदा धान पिकाच्या लागवटी पुर्वी नांगरणी करून ठेवलेली आहे. बियाणे लागवडीकरिता पावसाची प्रतीक्षा अजूनही कायम आणि आता शेतकऱ्यांच्या नजरा या आकाशाकडे लागल्या असून पावसाळ्याचे पाणी केव्हा पडते आणि शेतीच्या कामाला केव्हा सुरुवात करतो अशा प्रतीक्षेत गोंदिया जिल्ह्यातील शेतकरी आहेत.