
बुलढाणा – कपाशीचे खोटे पंचनामे केल्याचा आरोप करत नुकसान भरपाई देण्यात यावी, या मागणीसाठी खामगाव तालुक्यातील अंत्रज येथील शंकर देशमुख यांनी आज जिल्हा कृषी अधिकारी यांच्या दालनात अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. उपस्थित नागरिकांनी त्यांना आत्मदहनापासून रोखले असून तातडीने त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार करण्यासाठी दाखल करण्यात आले आहे.