
बुलढाणा: गेल्या एका महिन्यांपासून पावसाने दडी मारल्याचे चित्र दिसून येत आहेत.त्यामुळे पाण्याअभावी शेतकऱ्यांची पिके करपू लागली आहेत.काही ठिकाणाच्या शेतकऱ्यांकडे विहिरीमध्ये थोड्याफार प्रमाणात पाणी उपलब्ध आहे. ते पाणी देऊन शेतकरी पीक जगवण्याचा प्रयत्न करत आहेत.मात्र वीजपुरवठा वारंवार खंडीत होत असल्याने शेतकऱ्यांना पानी देण्यास अडचण निर्माण होत आहे. नियमानुसार देण्यात आलेला वीजपुरवठा हा चारच तास देण्यात येत आहे त्यातूनही वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने पाण्याच्या मोटारी जडत आहेत.
दरम्यान, खामगाव महावितरण कार्यालय अंतर्गत येणाऱ्या पारखेड, आंबोडा,चिखली,पहूर्जिरा,माटरगाव येथील ४० ते ५० शेतकऱ्यांनी व शेतकरी नेत्यांनी महावितरण चे कार्यकारी अभियंता यांना भेटून आपल्या समस्या मांडल्या.