शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे

0

 

– विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar)

(Nagpur)नागपूर -अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे उरलं सुरलं जे स्वप्न आहे ते सर्व उध्वस्त झालेलं आहे. यासाठी 2 डिसेंबरपासून यवतमाळ इथून आम्ही दौरा सुरू करणार आहेत. जालना, वाशिम चार दिवस शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन या सगळ्या परिस्थितीचे पाहणी करणार. शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे. नुकसान भरपाई संदर्भात मागणी येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात लावून धरणार आहोत अशी माहिती विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिली.
40 तालुक्यात सोडून नव्याने एक हजार मंडळात दुष्काळ जाहीर केला. त्याला केंद्र सरकारची मदत मिळू शकत नाही. सरकार उपसमितीची बैठक न घेतल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे. राज्य सरकारच्या तिजोरीत द्यायला शेतकऱ्यांसाठी पैसे नाही. मी 2 ते 5 डिसेंबर दौरा करणार आहे. आम्ही संपूर्ण परिस्थिती सरकारपुढे मांडू यावर वडेट्टीवार यांनी भर दिला.
हिंगोली दौरा संदर्भात छेडले असता
त्यावर आता पडदा टाकलाय, माझ्या पक्षाचा कार्यक्रम होता, मी तिकडे गेलो होतो असे सांगितले.
कोण काय म्हणतं? यापेक्षा सरकार काय करते? हे महत्वाचे आहे.सरकारने मनोज जरांगे यांना आश्वासित केले आहे. सरकारच्या भूमिकेकडे आम्ही लक्ष ठेवून बसलो आहोत. जरांगे यांनी जर शब्द मागे घेतला असेल तर अशी सद्बुद्धी त्यांना मिळो. त्यांच्या मुखातून असे कुठलेही शब्द येऊ नयेत. कोणत्याही समाजात तेढ निर्माण होऊ नये, गुण्या गोविंदाने सर्व राहावेत,ज्यांच्या त्यांच्या हक्काच त्यांना मिळावं, तो शब्दमागे घेतल्याबद्दल जरांगे पाटलांना धन्यवाद देतो.एखाद्या सभेत गेलो नाही म्हणजे भूमिका काय या संदर्भात बोलण्याची गरज नाही. एका राजकीय पक्षात मी काम करतो. मी विरोधी पक्ष नेता आहे. शेवटी पक्षाचा आदेश हा महत्त्वाचा असतो. शिंदे समिती रद्द करण्याच्या मागणीबाबत वडेट्टीवार म्हणाले,
हा हास्यास्पद प्रकार आहे. राज्यातला एक मंत्री शिंदे समिती बरखास्त करा म्हणतो आणि सरकार त्यांचं ऐकत नाही अशी स्थिती आहे. एकाच घरात राहणारे एकमेकांशी भांडण्याचा हा प्रयोग दिसतो. ही समिती बरखास्त करावी की नाही करावी हे आम्ही अधिवेशनात मांडू. शिंदे समिती गठित झाली. त्याचवेळी मंत्री म्हणून भुजबळ यांनी भूमिका स्पष्टपणे मांडायला हवी होती. त्यांच्या मागणीला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री किती दाद देतात हे पाहू असे स्पष्ट केले. ते नारायण राणे आणि शिंदे यांनाच विचारलं पाहिजे. कोणाच्या घरात किती पाकीट गेले? कोणाच्या घरात किती पाकीट आले? हे त्यांना माहित. त्यासंदर्भात आमचा संबंध नाही. आम्ही कोणाच्या खिडकीतून डोकावत नाही असेही विजय वडेट्टीवार म्हणाले.

 

अमरावती जिल्ह्यात संततधार पाऊस शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

(Amravti)अमरावती – काल सकाळपासूनच अमरावती जिल्ह्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. अमरावती जिल्ह्यात अजूनही मुसळधार पाऊस सुरू आहे. या अवकाळी पावसामुळे शेतातला कापूस पूर्ण ओला झाला असून या बदलत्या ढगाळ वातावरणामुळे तुरीवर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव सुद्धा वाढला आहे. सोबतच भाजीपाला पिकांचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

 

अवकाळी पावसाने बुलढाणा गारठला ; खामगावात धुक्याची चादर

(Buldhana)बुलढाणा– जिल्ह्यात हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार अवकाळी पावसाने विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यात काही ठिकाणी गारपीट सुद्धा झाली. दिवसभर पावसाने घेतलेल्या विश्रांतीनंतर रात्रीपासून रिमझिम पावसाला सुरुवात झाली, आज सकाळपासून बुलढाणा जिल्ह्यात गारवा निर्माण झाला आहे. त्यामुळे संपूर्ण खामगाव शहरावर धुक्याची चादर पसरली आहे. हवेतील वाढत्या गारव्याने नागरिकांच्या आरोग्याच्या चिंता वाढल्या आहेत. तसेच वातावरणाच्या बदलामुळे गहू, हरभरा, तूर पिकावर रोगराई वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.