वर्ध्यात १७ सप्टेंबर ला शेतकरी हक्क न्याय परिषद

0

संयुक्त किसान मोर्चा चे आयोजन

विदर्भातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा न्यायाचा प्रश्नसाठी वर्ध्यात शेतकरी न्याय हक्क परिषद 17 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे.

केंद्र सरकारने कापसावरील आयात बंदी उठवावी,
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला ताकद वाढवावी,
पुढील शेतकरी आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी ही परिषद घेण्यात येत आहे.
त्या शेतकरी आंदोलनाचे देश स्तरावरील  प्रमुख पुढारी आता 17 ते 19 सप्टेंबर 2025 दरम्यान विदर्भ दौऱ्यावर असून वर्धा येथे  भव्य शेतकरी हक्क न्याय परिषद आयोजित केली आहे. राकेश टीकेत, अशोक ढवळे, बच्चू कडू, अजित नवले, यांच्यासह दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत.
ही परिषद सार्वजनिक बजाज वाचनालय येथे सकाळी 11 होणार आहे .

वर्धा जिल्ह्यातील सर्व शेतकरी, शेतकरी चळवळीतील कार्यकर्ते, सर्व राजकीय पक्षांचे शेतकरीप्रेमी कार्यकर्ते व नागरिकांनी या शेतकरी हक्क न्याय परिषदेला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आज पत्रकार परिषदेत आयोजन समिती सदस्य  अविनाश काकडे , यशवंत झाडे  , मनोज चांदुरकर , सुनिल राऊत , राजू खुपसरे , अतुल वांदिले , सुदाम पवार , किरन ठाकरे , डॉ सचिन पावडे , हरिष इथापे , महेंद्र मुनेश्वर, प्रमोद भोबले  , द्वारका इमडवार , तुषार उमाळे , अतुल शर्मा , नितेश कराळे , निहाल पांडे , नरेंद्र मसराम , आमिर अलि अजानी , भैयाजी देशकर अभ्युदय मेघे सुधिर पांगुळ चंद्रशेखर मडावी दुर्गा काकडे यांनी केले आहे.