राष्ट्रवादी कॉंग्रेसचा धडकला शेतकरी जन आक्रोश मोर्चा

0

 

अमरावती -अमरावतीत पवार गटाचा जनआक्रोश मोर्चा निघाला असून नेहरु मैदानापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा धडकला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, आमदार रोहित पवार, महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे मोर्चाला उपस्थित असून शेतकरी, कामगार, विद्यार्थी, युवक /तसेच सध्याच्या ज्वलंत प्रश्नांवर शरद पवार गट आक्रमक झाला आहे. अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा येणार असल्याने पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात होता.मोर्चात शेतकरी, राष्ट्रवादीचे कार्यकर्त्यांचा सहभाग होता.राज्य व केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.