कांदा निर्यात शुल्काला शेतकऱ्यांचा विरोध

0

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना Onion farmers  आता चांगल्या भावाला मुकावे लागणार आहे. केंद्र सरकारने कांदयाच्या दारात वाढ केल्याने सर्वसामान्यांच्या खिश्याला कात्री लागणार आहे. Central Govt केंद्र सरकारकडून याचे नोटिफिकेशन जारी करण्यात आले आहे. तर, दुसरीकडे सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार असल्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर ४० टक्के शुल्क लावले आहे. हे निर्यात शल्क ३१ डिसेंबर २०२३ पासून लागू करण्यात येणार आहेत. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे शेकऱ्यांचे नुकसान होणार असल्याची भीती शेकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. आधीच कांद्याला भाव नाही त्यात शुल्क लावून केंद्र सरकार शेतकऱ्यांची अडवणूक करत असल्याने केंद्र सरकारच्या निर्णयाचा येवल्यातील शेतकऱ्यांकडून विरोध होतो आहे. या शुल्काला कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून विरोध होताना दिसतो आहे.