निम्न पैनगंगा धरणाला शेतकर्‍यांचा विरोध कायम

0

 

यवतमाळ – यवतमाळ जिल्ह्याच्या सीमेला लागून असलेल्या सावळी सदोबा परिसरातील ४५ गावापेक्षा जास्त निम्न पैनगंगा धरणामुळे विस्थापित होणार आहे. सुपिक जमिन प्रकल्पामुळे बुडीत होणार असल्याने या धरणाला तीव्र विरोध दर्शवित शेतकर्‍यांनी उमरी कापेश्‍वर अनेक गावांमध्ये आमरण उपोषण सुरू केले आहे. मागण्या मान्य होणार नाही. तोपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार शेतकर्‍यांनी केला आहे.
विदर्भ व मराठवाड्यातील जवळपास १०० ते १२५ गावातील सुपिक जमिन निम्न पैनगंगा धरणासाठी संपादीत करून धरणाचे पाणी आंध्रप्रदेशाला मिळणार आहे. तत्कालीन आमदार शिवाजीराव मोघे यांच्या कार्यकाळात या धरणाला मंजुरी मिळाली आहे. पेसा भागातील जमिन शासनाला संपादीत करता येत नाही. तरीही जमीन धरणासाठी घेऊन येथील शेतकर्‍यांना उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला जात असल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत.