जिल्ह्यात अजूनही शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत

0

 

गोंदिया -जिल्ह्यात ज्या प्रमाणात जुलै महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो, त्यानुसार अद्यापही गोंदिया जिल्ह्यात पावसाचे आगमन झाले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. जिल्ह्यात पावसाचे उशिरा आगमन झाल्याने शेतकऱ्यांनी यापूर्वी अनेकांवर दुबार पेरणीच्या संकट आले होते. आता मात्र, शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत असताना पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणारे शेतकरी हव्या त्या साधनांनी आता पाणीपुरवठा करून आपल्या शेतीचे कामे उरकवून घेत आहेत. तरी अद्यापही मोठ्या प्रमाणात शेतीला पावसाची गरज आहे आता सगळ्यांच्या नजरा या आकाशाकडे लागल्या आहेत. गोंदिया जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून रात्री पाऊस पडत असून शेतकरी कंबर कसून शेत कामाला लागला आहे. जिल्ह्यात रात्रीला पाऊस येत असून दिवसा ऊन असले। तरी शेतकरी आता जोरदार पावसाची प्रतिक्षा करीत आहे.