
(BULDHANA)बुलढाणा – (Farmer leader Ravikant Tupkar)शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सोयाबीन-कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी 20 नोव्हेंबरला बुलढाण्यात एल्गार महामोर्चा काढला. या महामोर्चात तुपकर यांनी सरकारला 8 दिवसांचा अल्टिमेटम दिला होता. मागण्या मान्य केल्या नाही तर 29 नोव्हेंबरला मंत्रालय ताब्यात घेऊ असा इशारा तुपकर यांनी दिला आहे. दोन दिवसांपासून रविकांत तुपकर यांनी सोमठाणा येथे अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते. आता ते आंदोलन सुरू ठेवून रविकांत तुपकर हे मुंबईकडे रवाना होत आहेत.