
मुंबई MUMBAI : एकदिवसीय वर्ल्ड कप स्पर्धेत आतापर्यंत अपराजित राहिलेला भारतीय संघ उपांत्य फेरीपासून केवळ एक विजय दूर आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर Wankhede Stadium गुरुवारी श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या सामन्यात भारताने विजय मिळवल्यास उपात्य फेरीचा प्रवेश निश्चित होणार आहे. तर दुसरीकडे श्रीलंकेचे आव्हान संपल्यात जमा आहे. केवळ काही चमत्कारच श्रीलंकेला उपांत्य फेरीत प्रवेश घडवू शकतो, असे मानले जात आहे. त्यामुळे श्रीलंका आज पराभूत झाल्यास त्यांचे आव्हान संपुष्टात येणार आहे. (India vs Sri Lanka Match, World Cup 2023)
स्पर्धेत अनेक सामन्यांत पराभूत झालेल्या पाकिस्तान संघाचा उपांत्य फेरीतील प्रवेशही संकटात आहे. पाकिस्तान उपांत्य फेरीत पोहचण्यासाठी त्यांना आता इतर संघांच्या कामगिरीवर अवलंबून रहावे लागणार आहे. त्यामुळे गणित पाहिल्यास आजच्या भारताच्या विजयासाठी पाकिस्तान क्रिकेट चाहतेही आतुर असतील. कारण गुणतालिकेत पाचव्या क्रमांकावर असलेला पाकिस्तानचा संघ भारताच्या विजयाने चौथ्या क्रमांकावर येऊ शकतो. तर श्रीलंका जिंकल्यास ते पाकिस्तानच्या बरोबरीत येऊन त्यांच्यापुढे उपांत्य फेरीचे आव्हान निर्माण करु शकतात. सोशल मीडियावरही अनेक पाकिस्तानी चाहत्यांनी टीम इंडियाच्या विजयासाठी ट्वीट केले आहे. पाकिस्तान संघाला उपांत्य फेरीत पोहचण्यासाठी भारतीय संघाला सर्व सामन्यात विजय मिळवावा लागणार आहे.