

दररोज 70 रुग्णांवर उपचार
(Amravati)अमरावती – अमरावतीत डोळे येण्याचे प्रमाण वाढले आहे. आतापर्यंत अमरावती जिल्ह्यात 2 हजार 600 रुग्ण आढळलेत. एकट्या जिल्हा सामान्य रुग्णालयात आठवरभरात 400 रुग्ण डोळे येण्याच्या म्हणजे कंजक्टीव्हायटीस आजाराने ग्रस्त असलेले रुग्ण आढळले. (Conjunctivitis)कंजक्टीव्हायटीस हा संसर्गजन्य आजार असल्याने सर्वांनी काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. डोळ्यांवरती सूज येणे, डोळ्यांचा पांढरा भाग लाल होणे, डोळ्यातून पाणी येणे, ही प्रमुख लक्षणे या आजाराची आहेत. यापासून काळजी घेण्यासाठी आपला टॉवेल किंव्हा रुमाल कुणाला वापरायला देऊ नये, कपडे वेगळे धुतले जातील याची काळजी घ्यावी, डोळ्याला जास्त हात लावू नये, हात स्वच्छ ठेवावे, लक्षणे वाटल्यास नेत्रतज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घावा, असे आवाहन देखील आरोग्य विभागाने केले आहे.