धान/भरडधान्य खरेदीसाठी शेतकरी नोंदणीकरिता मुदतवाढ

0

ठाणे(Thane)

खरीप पणन हंगाम 2024-25 मध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत धान/भरडधान्य खरेदीसाठी ऑनलाईन शेतकरी नोंदणीकरिता याआधी दि.15 डिसेंबर 2024 पर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र, अभिकर्ता संस्थांनी नोंदणीस मुदतवाढ देण्याच्या विनंतीच्या अनुषंगाने खरीप पणन हंगाम 2024-25 मध्ये धान/भरडधान्य खरेदीकरिता शेतकऱ्यांच्या नोंदणी प्रक्रियेला दि.31 डिसेंबर 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, असे शासनाचे अवर सचिव श्री.विकास राऊत यांनी कळविले आहे.