नागपूर- जनतेच्या प्रश्नी चर्चा व्हावी यासाठी दोन दिवस अधिवेशन वाढवावे अशी मागणी विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी माध्यमांशी बोलताना केली. हिवाळी अधिवेशन उद्या 20 डिसेंबरला संपत आहे या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.
दानवे म्हणाले, अजित पवार यांनी आपली इच्छा लपवली नाही. तीन पक्षाची तीन तोंड आहेत.संघाची भूमिका आणि पक्षाची भूमिका वेगळी आहे. २६ हजार कोटींच्या मीटरबाबत मी विषय मांडला आहे. त्यावर अद्याप उत्तर आलेले नाही.भाजपने रथयात्रा काढण्यापेक्षा विकास यात्रा काढावी.
त्यांनी विकास काय काय केला? ते सांगावं.आम्हीही चर्चेला तयार आहोत.
आम्ही होऊ दे चर्चा हे कार्यक्रम हाती घेतला असेही अंबादास दानवे म्हणाले.