

ठाणे(Thane), 23 मे ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली एमआयडीसी परिसरतल्या सानारपाडा इथल्या केमिकल कंपनीत आज, गुरुवारी मोठा स्फोट झाला. यात 6 जणांचा मृत्यू झाला असून 15 जण जखमी झाल्याची माहिती पुढे आलीय. या स्फोटाचा आवाज सुमारे 3 ते 4 किलोमीटर अंतरापर्यंत ऐकू गेला.
डोंबिवली एमआयडीसी फेज-2 मधील अंबर केमिकल या कंपनीत मोठा स्फोट झाला. यात 4 जणांचा मृत्यू झालाय. स्फोटाची माहिती मिळताच डोंबिवली अग्निशामक दलाचे बंब घटनास्थळी दाखल झालेत. हा स्फोट एवढा मोठा होता की आजूबाजूच्या इमारतींच्या व रस्त्यावर लावलेल्या काचा फुटल्या आहेत. एमआयडीसी सागाव साईबाबा मंदिर मागे कंपनीत बॉयलरच स्फोट झाला असून आजूबाजूच्या परिसरामध्ये हवेतून राख उडत होती. अंबर केमिकल्समध्ये स्फोट झाल्यानंतर रस्त्यावरर मोठ्या प्रमाणावर राख उडाली आहे. तसंच मोठे लोखंडी कणही उडाले आहेत. राख वाहनांवर पडत होती. तसेच कंपनीतून स्फोटांचे आवाज येत आहेत त्यामुळे एमआयडीसी परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अंबर केमिकल कंपनीच्या परिसरातील अनेक इमारतींच्या घराच्या काचा तावदाने फुटली आहेतट काही पादचारी राखेने माखले होते.
दरम्यान डोंबिवली एमआयडीसीतील स्फोटाची घटना दु:खद असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेत. या घटनेत 8 जण अडकले होते, त्यांना बाहेर काढण्यात आले आहे. जखमींच्या उपचाराची व्यवस्था करण्यात आली असून आणखी रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आल्याची माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिली. तसेच, संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा झाल्याचेही त्यांनी सांगितले. तर मंत्री उदय सामंत यांनी दुर्घटनास्थळी भेट देऊन मदतकार्याचा आढावा घेतला. या दुर्घटनेत जखमी झालेल्यांच्या उपचाराचा संपूर्ण खर्च सरकारतर्फे करण्यात येणार आहे. या दुर्घटनेची संपूर्ण चौकशी केली जाईल, अशी माहितीही मंत्री सामंत यांनी दिली.
पाच टप्प्यांतच भाजपा तीनशेपार
अमित शाहांचा मोठा दावा
अठराव्या लोकसभा निवडणुकीसाठी पाच टप्प्यातील मतदान आटोपलं असून, आता शेवटच्या दोन टप्प्यातील मतदान शिल्लक आहे. दरम्यान, आतापर्यंत झालेल्या मतदानामधून देशातील वारे कुठल्या दिशेने वाहताहेत याचा अंदाज घेतला जात आहे. वेगवेगळे राजकीय विश्लेषक लोकसभा निवडणुकीतील निकालाबाबत वेगवेगळे दावे करत असताना आता भाजपा नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भाजपाच्या निवडून येणाऱ्या जागांबाबत मोठं भाकित केलं आहे. पहिल्या पाच टप्प्यांमध्ये मतदानामध्ये भाजपाने ३१० जागांचा टप्पा ओलांडला. आहे. तर काँग्रेसला यावेळी ४० जागाही मिळणार नाहीत, असा दावा अमित शाह यांनी केला आहे. पहिल्या पाच टप्प्यांमधील मतदानामधून इंडिया आघाडीचा सफाया झाला आहे, असा टोला अमित शाह यांनी लगावला आहे.
डोंबिवली MIDC मध्ये भीषण स्फोट
अमुदान कंपनीचे बॉयलर फुटल्याने ६ ठार, 50 जखमी
डोंबिवली येथील एमआयडीसी परिसरातील अमुदान कंपनीचे बॉयलर फुटले. कंपनीत गुरुवारी दुपारी भीषण स्फोट झाला. स्फोटानंतर लगेचच कंपनीला आग लागली. या घटनेत ६ जण ठार, तर 50 जण जखमी झालेत. कंपनीच्या बॉयलरमध्ये स्फोट झाल्यामुळे ही दुर्घटना घडली आहे. या स्फोटाची झळ आसपासच्या इमारतींना बसली आहे. या स्फोटाचा आवाज कित्येक किलोमीटर दूर ऐकू आला. अग्निशमन दलाच्या 40 हून अधिक गाड्या दाखल झाल्याहोत्या .
————
ताडोबा बफर आणि कोअर झोन मध्ये आज प्राणी गणना
बुध्द पौर्णिमेच्या रात्री चंद्रप्रकाशात होणार गणना
आज 23 मे ला बुध्द पौर्णिमेच्या रात्री लखलत्या चंद्रप्रकाशात ताडोबातील बफर व कोअर झोनमध्ये वन्यप्राणी गणना होणार आहे. दोन्ही झोनमध्ये वनविभागाने तयारी पूर्ण केली असून पर्यटक व अधिकारी सज्ज झाले आहेत. बफरम मध्ये 79 मचाणी वरून 160 पर्यटक प्राणी गणना होणार आहे.
————
राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक २७ मे रोजी होणार
महत्वाचे प्रमुख नेते उपस्थित राहणार
राष्ट्रवादी काँग्रेसची महत्वाची बैठक सोमवार दिनांक २७ मे रोजी सकाळी ११ ते २ यावेळेत गरवारे क्लब हाऊस मुंबई येथे आयोजित करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली व राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल व ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत ही महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीला मंत्री, आजी, माजी खासदार, आमदार, २०२४ चे लोकसभा उमेदवार, प्रदेश पदाधिकारी, फ्रंटल व सेलचे राज्यप्रमुख, प्रवक्ते, पॅरंट बॉडी जिल्हाध्यक्ष, कार्याध्यक्ष, महिला व युवक जिल्हाध्यक्ष, युवती विभागीय अध्यक्ष व समन्वयक आणि मुंबई विभागीय अध्यक्ष, कार्याध्यक्ष यांना निमंत्रित करण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस व कोषाध्यक्ष शिवाजीराव गर्जे यांनी दिली.
————
पश्चिम बंगालमध्ये 77 मुस्लिम जातींचा ओबीसी दर्जा रद्द
उच्च न्यायालयाच्या निकालानंतर बदलली आरक्षणाची गणित
कोलकाता उच्च न्यायालयाने राज्य सरकारने 2010 नंतर दिलेली सर्व ओबीसी प्रमाणपत्रे रद्द केली आहेत. या निर्णयात उच्च न्यायालयाने मुस्लिमांना एप्रिल 2010 ते सप्टेंबर 2010 या कालावधीत ओबीसी अंतर्गत 77 प्रवर्गात दिलेले आरक्षण रद्द केले आणि 2012 च्या कायद्यानुसार त्यांच्यासाठी निर्माण करण्यात आलेले 37 प्रवर्ग रद्द केले. या निर्णयाच्या दिवसापासून रद्द झालेली प्रमाणपत्रे कोणत्याही रोजगार प्रक्रियेत वापरता येणार नाहीत, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
उच्च न्यायालयाच्या न्या. तपोन्नत चक्रवर्ती आणि न्या. राजशेखर मंथा यांच्या खंडपीठाने मंगळवारी 22 मे रोजी दिलेल्या निकालामुळे राज्यातील सुमारे 5 लाख ओबीसी प्रमाणपत्रे अवैध ठरणार आहेत. मात्र, या प्रमाणपत्रांद्वारे आधीच संधी मिळालेल्या उमेदवारांना या निर्णयाचा फटका बसणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. न्यायालयाने आपल्या निकालात तृणमूल सरकारचा उल्लेख केलेला नाही. योगायोगाने 2011 पासून राज्यात तृणमूलची सत्ता आहे. त्यामुळे न्यायालयाचा आदेश तृणमूल सरकारने जारी केलेल्या ओबीसी प्रमाणपत्रवरच लागू होईल.
पुण्यातील अग्रवाल कुटुंब गोत्यात
नातू आणि मुलानंतर आता आजोबांची चौकशी
पुण्यातील हिट अँड रन प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणी अल्पवयीन वेदांतला बाल सुधार गृहात ठेवण्यात आलं आहे. त्याच्या वडिलांना म्हणजे विशाल अग्रवाल यांना अटक करण्यात आली आहे. त्यापाठोपाठ आता वेदांतच्या आजोबांनाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं आहे. वेदांतच्या आजोबांची कसून चौकशी करण्यात येत आहे. एका जुन्या प्रकरणात ही चौकशी होत आहे. त्यामुळे अग्रवाल कुटुंब चांगलंच गोत्यात येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
———
वायरमनचा खांबावरच मृत्यू
विजेचा झटका लागल्याची घटना
वीजेचा झटका लागल्यामुळे खांबावरच एका वायरमनचा मृत्यू झाला. ही घटना नविन कामठी पोलिस ठाण्यांतर्गत बुधवारी घडली. भारत रामभाऊ वईले (३२, रा. जुनी कामठी कन्हान) असे मृत्यू झालेल्या वायरमनचे नाव आहे. ते नविन कामठी पोलिस ठाण्याच्या हद्दीत सईदनगर, कामठी रोड, मोरबी टाइल्स समोर इलेक्ट्रीकच्या खांबावर चढून वायर दुरुस्ती करीत होते. अचानक त्यांना वीजेचा धक्का लागला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांना खाली उतरवून उपचारासाठी कामठीच्या उपजिल्हा रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी त्यांच्या सोबत काम करणारे मोहम्मद सईद मोहम्मद इसाक सय्यद यांनी दिलेल्या सूचनेवरून नवीन कामठी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरु केला आहे.