आईस फॅक्टरीत स्फोट, एकाचा मृत्यू

0

 अमोनिया पसरल्याने अनेकांचा श्वास गुदमरला

नागपूर Nagpur  -उप्पलवाडी Uppalwadi  परिसरात असलेल्या बर्फाच्या कारखान्यात  Ice factories शनिवारी सायंकाळी स्फोट होऊन एक कर्मचारी जखमी झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हा स्फोट इतका भीषण होता की परिसरातील घराच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बर्फाच्या कारखान्यातील बॉयलरमध्ये साठवलेल्या अमोनिया गॅसमुळे हा स्फोट झाला. स्फोटानंतर वायू परिसरात पसरल्याने लोकांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याची माहिती आहे. अनेक वाहनांचे या स्फोटात नुकसान झाले असून भिंत कोसळल्याने मलबा पसरला दिसत आहे. खबरदारी म्हणून 200 मीटरपर्यंतच्या परिसरात प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली असून घटनास्थळी सुगत नगर अग्निशमन केंद्राची चमू सर्व खबरदारीच्या उपाययोजनासह तैनात आहे. हा स्फोट कसा झाला, याविषयी माहित नाही मात्र दोघे मजूर आत होते. एक जण श्वास गुदमरून बेशुद्ध झाल्याने त्याला रुग्णालयात नेण्यात आल्याची माहिती कारखाना व्यवस्थापक अजय साहू यांनी माध्यमांशी बोलताना दिली.