

नागपूरात ३७.७१ लाखांच्या महागड्या विदेशी मद्य साठ्यासह मुद्देमाल जप्त
नागपूर, १० नोव्हेंबर (हिं.स.) : येथील धरमपेठ परिसरात ३७.७१ लाख रुपयांचा महागड्या विदेशी मद्याचा साठा आणि अन्य मुद्देमाल जप्त केला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने सिताबर्डी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई केली. महाराष्ट्रात विक्रीसाठी प्रतिबंधित असलेला हा मद्यसाठा हरियाणामधून आणल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणात आरोपी निलय गडेकर याला अटक करून त्याच्यावर मुंबई दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.