नागपूर – राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे, संविधान चौकातील आंदोलनाचा बुधवारी ११वा दिवस आहे. जोपर्यत राज्य सरकारकडून लेखी मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरुच राहणार असल्याचे अध्यक्ष डॉ बबनराव तायवाडे ह्यांनी सांगितले.
आज २३ लोक साखळी उपोषणाला बसले. यात प्रामुख्याने रमेश नाईक, गणेश नाखले राजेश ढेंगे ,नाना सातपुते, गेमराज गोमासे, निलेश कोढे,शरद वानखेडे, डॉ अरुण वराडे,दौलत शास्त्री, रमेश मामा राऊत केशव राऊत, गजानन दांडेकर,शकील पटेल यांचा समावेश असून आज माजी आमदार, भाजपचे राज्य ओबीसी प्रमुख डॉ आशिष देशमुख, यांनी सरकार तुमच्या आवाहनाला प्रतिसाद देईल असे सांगितले, कांग्रेस चे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी ओबीसींच्या आरक्षणाला पाठिंबा जाहीर करुन, मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण देण्यात यावे. सत्तारूढ नेत्यांनी या आंदोलनाचा तिढा सोडवावा अन्यथा आंदोलन उग्र झाल्यावर कठीण होईल असा इशारा दिला. डॉ बाबासाहेब आंबेडकर असो. यांनीही पाठिंबा दिला. या आंदोलनात डॉ विनोद गावंडे, अरुण वराडे, कल्पना मानकर, नयना झाडे, रवी वानखेडे, शुभम वाघमारे, विनोद हजारे राजेश काकडे, सुभाष घाटे, परमेश्वर राऊत, नाना झोडे, निलेश कोढे, भास्कर भनारे , गजानन दांडेकर, गणेश हांडे, गणेश गडेकर,साधना पाटील, हेमंत गावंडे, शकील पटेल, आरिफ हुमायु. सुरेश वर्षे, अरुण वनकर, विकास गौर आदी विविध जाती समुहातील ओबीसी बांधव मोठ्या संख्येने हजर होते.













