

Even if you are an Indian, you need special permission to enter ‘this’ place in India
(India)भारतात किंवा कोणात्याही देशा पर्यटन किंवा इतर कामासाठी जायचे असेल तर विशेष नियमांनुसार आपल्या पासपोर्ट तसेच विशेष व्हीसा लागतो. काही देश असे आहेत जेथे भारतीयांना व्हीसाची गरज लागत नाही. परंतू भारतात देखील काही ठिकाणी जाण्यासाठी आपल्याला विशेष परवानगी लागते. या इनर लाईन परमिशन ( सरकारद्वारा प्रवासासाठी जारी केलेले अधिकृत कागदपत्र ) म्हटले जाते. या राज्यात पोहचल्यानंतर आपल्याला तेथील प्रशासनाची ( पर्यटन कार्यालय किंवा डीसी ऑफीस ) लेखी परवानगी लागते. काही ठिकाणी ऑनलाईन देखील परमिट मिळते. तर पाहूयात भारतात अशी कोणती ठिकाणे आहेत. ?
भारतात अशी अनेक राज्ये आहेत. जेथे सुरक्षेसाठी परदेशी नागरिकांसह भारतीयांना देखील प्रवेश करताना परमिटची गरज लागते. यातील काही राज्य आंतरराष्ट्रीय सीमांना जोडलेली आहेत. काही राज्यांना सांस्कृतिक वारसा असल्याने ती संरक्षित असल्याने काळजी घेतली जाते. तर पाहूयात कोणती आहेत ही राज्ये ?
अरुणाचल प्रदेश –
भारताचे उत्तर – पूर्वेला असलेले अरुणाचल त्याच्या नैसर्गिक सौदर्यसाठी ओळखले जाते. तुम्ही येथे जाण्याचा विचार करत असाल तर परमिट गरजेचे असते. डोंगर, दऱ्या आणि हिरवा निसर्ग, निळेशार तलाव, धबधबे, नद्या यांनी हा प्रदेश नटलेला आहे. गोम्पा बौद्ध मंदिर आदी ठिकाणी पर्यटकांना फिरायला आवडते. पक्षांच्या अनेक प्रकारच्या जाती येथे पाहायला मिळतात. येथे तीन व्याघ्रप्रकल्प देखील आहेत. येथे तुम्ही जंगल सफारी करु शकता.
नागालॅंड –
भारताचे नैसर्गिक सौदर्याने नटलेले नागालॅंड देखील संरक्षित आहे. येथे प्रवेशासाठी परदेशी नागरिकच नव्हे तर भारतीयांना देखील विशेष परवानगी लागते. येथे अनेक जातीचे धर्माचे लोक राहातात. त्यांच्या समृद्ध बोली ऐकायला मिळतात. येथे अनेक पशू –पक्षी आहेत. भौगोलिक दृष्टया देखील हा प्रदेश सुंदर आहे.
मिझोरम –
निळ्या आणि हिरव्या पर्वतांनी नटलेला मिझोरम भारतातील एक सुंदर ठिकाण आहे. येथील ट्रीप जीवनासाठी आनंद देणारी ठरते. परंतू तुम्हाला परमीटची गरज लागते. येथील नैसर्गिक सुंदरता आणि संस्कृती सर्वांना आवडेल अशी आहे.
Even if you are an Indian, you need special permission to enter ‘this’ place in Indiaलडाख –
लडाख हा केंद्र शासित प्रदेश आहे. येथील पर्वत, नदी, तलाव, खोल दऱ्या आणि बौद्ध मठ देशी तसेच परदेशी पर्यटकांना नेहमीच आकर्षित करीत असता. येथील लाकडाची टुमदार घरे खुपच सुंदर आहेत. येथे जाण्यासाठी तुम्हाला विशेष मंजूरी लागते.
सिक्कीम –
भारतातील पूर्वेला असलेले सिक्कीम सर्वात छोटे राज्य असले तरी महत्वाचे आहे. येथील सौदर्य पाहायचे असेल तर परवानगी लागते. देशातील सर्वात उंच तिसरे शिखर कांचनजंगा येथे आहे. तसेच तुम्ही गंगटोक येथे देखील जाऊ शकता. तुम्हाला येथील शांतता आवडले. येथील शॉपिंग देखील करु शकता. तसेच ट्रॅकींग, पॅराग्लायडिंग सारखे साहसी प्रकार देखील येथे करायला मिळतात.
लक्षद्वीप –
भारताचे आणखी एक केंद्र शासित राज्य लक्षद्वीप येथे परमिट लागते. निळेशार समुद्र, पांढरी शु्भ्र पसरलेल्या वाळेच समुद्र किनारे आणि हिरव्या निसर्गाचा आनंद तुम्हाला या ठिकाणी घेता येतो. येथील खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येतो. येथील वॉटर स्पोर्ट्सचा देखील आनंद तुम्हाला घेता येतो.