इथेनॉल वरील बंदीचा निर्णय मागे

0

मुंबई MUMBAI : ऊसाचा रस आणि मोलॅसिसपासून इथेनॉल (Ethanol) निर्मितीवरील बंदीचा निर्णय केंद्र सरकारने मागे घेतला आहे. साखरेचे साठे कमी होत असल्याने Central Govt केंद्र सरकारने साखरेच्या वाढत्या किमतीला लगाम घालण्यासाठी हा निर्णय घेतला होता. मात्र, या निर्णयाला विरोध झाल्याने अखेर सरकारने हा निर्णय मागे घेतला आहे. या निर्णयामुळे १७ लाख टनापर्यंत साखरेचा इथेनॉल निर्मितीसाठी वापर करण्यास साखर कारखानदारांना मुभा मिळणार आहे. हा निर्णय साखर कारखानदारांना दिलासा देणारा ठरला आहे.

केंद्र सरकारने साखर उद्योगातील खासगी आणि सहकारी साखर कारखान्यांना प्रोत्साहन, सबसिडी आणि व्याजामध्ये सवलत देऊन इथेनॉलचे प्रकल्प उभे करण्यास सांगितले होते. साखर उद्योगाला चालना मिळावी यासाठी केंद्राने इथेनॉल निर्मितीला चालना दिली होती. यामुळे कोट्यवधी रुपयांचे भाग भांडवल देशातील साखर उद्योगाने यामध्ये गुंतवले आहे. अशातच अचानक केंद्र सरकारने इथेनॉलच्या उत्पादनावर बंदी घातल्याने कारखानदारांवर संकट निर्माण झाले होते. शेतकऱ्यांच्या ऊसाच्या दरावरही याचा परिणाम होण्याची शक्यता होती. इथेनॉलमध्ये साखर कारखान्यांनी अब्जावधी रुपये गुंतवले आहेत, त्याचे काय होणार असा सवाल उपस्थित केला जात होता. दरम्यान, स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी इथेनॉल निर्मितीसाठी दिलेल्या परवानगीचे स्वागत केले आहे.