


नागपूर: इपी कॉन्व्हेंट न्यू नंदनवनच्या विद्यार्थी तिर्थेश संदीप कापसे याने दहावीच्या परीक्षेत उत्तम यश मिळवून शाळेचा आणि पालकांचा मान उंचावला आहे. तिर्थेश यांनी एकूण ५०० पैकी ४५७ गुण मिळवून ९१.४०% गुण मिळवून शाळेत प्रथम क्रमांक पटकावला आहे.
विषयनिहाय गुण: मराठी: ९०,हिंदी: ८४, इंग्रजी: ७८, गणित: ९४ विज्ञान: ९२, सामाजिक विज्ञान: ९७ गुण मिळविले.
तिर्थेश हे लहानपणापासूनच हुशार आणि अभ्यासात मेहनती विद्यार्थी आहे. तिर्थेश यांच्या यशाबद्दल त्याच्या पालकांनी मोठा अभिमान व्यक्त केला आहे. त्यांनी त्याच्या अभ्यासात सदैव प्रोत्साहन देण्यासाठी आणि मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे आभार मानले.