

मुंबई (Mumbai), ११ सप्टेंबर : प्रकाशयोजनेतील जागतिक आघाडीवर असलेल्या सिग्नीफायने गणेश चतुर्थीच्या निमित्ताने देशातील सर्वात मोठ्या प्रदीप्त मोदकांचे अनावरण केले आहे. मुंबईत स्थापन झालेल्या या प्रदीप्त मोदकाचे नाव एशिया आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले आहे.
१६ फूट उंच आणि ४ फूट पायथ्याशी असलेल्या या मोदकाला प्रकाश देण्यासाठी फिलिप्सचे दिवे लावण्यात आले आहेत. हा मोदक (Modak)७ सप्टेंबरपासून पुढील ११ दिवसांसाठी चिंतामणी गणपती मंडळ आणि मुंबईतील लाल बागचा राजा चौकात बसवण्यात आला आहे.
७० हून अधिक जणांच्या टीमने १० दिवसांपेक्षा जास्त मेहनत घेऊन हा मोदक बनवला आहे. याबाबत सिग्नीफाय सीएसआर प्रमुख निखिल गुप्ता म्हणाले की, “भारतात सर्वोत्तम नावीन्य आणण्यासाठी आम्ही आमच्या सीमा ओलांडतो. हे मोदक म्हणजे भारताच्या चैतन्यमय भावनेला साजरे करण्याच्या आमच्या वचनबद्धतेचा पुरावा आहे.
मोदक हे भारतातील एक पारंपारिक गोड आहे, जे समृद्धीचे प्रतीक आहे आणि गणेश चतुर्थीच्या सणाशी संबंधित आहे.