‘कथक अश्वमेध’ नृत्य स्पर्धेच्‍या प्राथमिक फेरीला उत्‍स्‍फूर्त प्रत‍िसाद

0

 

(Nagpur)नागपूर, ९ ड‍िसेंबर 2023
भारत सरकारचे सांस्कृतिक कार्य मंत्रालय, निर्झर कला संस्था, गुरु कुंदनलाल गंगाणी फाउंडेशन आणि गुरु साधना फाऊंडेशन यांच्या द्वारे ‘कथक अश्वमेध’ या आंतरराष्ट्रीय कथक नृत्य स्पर्धेची विदर्भातील प्राथम‍िक निवड फेरी नागपुरात आज अशोका ट्रेन‍िंग रुम, चिटणवीस सेंटर, सिव्‍हील लाईन्‍स, नागपूर येथे पार पडला. या स्पर्धेला विदर्भातील कथकचे विद्यार्थी व कलाकारांचा उत्‍स्‍फूर्त प्रति‍साद लाभला.

कथक केंद्र दिल्लीचे सुभाषचंद्र भट्टाचार्य यांनी प्राथमि‍क फेरीचे परीक्षण केले. यावेळी श्याम जतकर, समीर नाफडे, श्याम शास्त्रकार आणि भूपेश मेहेर यांची प्रमुख उपस्थिती होती.

‘कथक अश्वमेध’ ची प्राथमि‍क फेरी भारतातील 40 वेगवेगळ्या शहरांमध्ये होत असून त्‍यात 12 ते 25 वयोगट व 26 ते 40 वयोगट अशा दोन गट करण्‍यात आले आहेत. देशभरातील प्राथमि‍क फेरीतून 140 विद्यार्थ्यांची निवड केली जाणार असून त्यापैकी सर्वोत्कृष्ट 7 नर्तक (प्रत्‍येक गटातले) महाअंतिम फेरीसाठी निवडले जातील. उपांत्य फेरी आणि महाअंत‍िम फेरी दिल्लीत होणार असून या कलाकारांना तेथे कला सादर करण्याची संधी मिळणार आहे. दोन्‍ही गटातील अंति‍म 3 विजेत्‍यांना भरघोस बक्ष‍िसे दिली जाणार आहेत.