

शिल कलासागर नागपुर तर्फे नागपूर महानगर पालिका वाल्मिकी नगर, हिंदी माध्यमिक शाळा गांधीनगर येथील गरजू विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या सात दिवसीय बालनाट्य कार्यशाळेचा थाटात समारोप झाला.
झोपडपट्टी वसाहतीत राहणा-या मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून वाल्मिकी नगर हिंदी माध्यमिक शाळा गांधीनगर येथे आयोजित या कार्यशाळेत 70 विद्यार्थी सहभाग झाले होते. समारोपीय कार्यक्रमाला अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई शाखा मध्यवर्तीचे संजय रहाटे, तांडव क्रियेशनचे किशोर बत्तासे, शाळेच्या मुख्याध्यापिका वंदना महाजन यांची प्रमुख उपस्थिती होती.
शाळेत पहिल्यांदाच नाट्य कार्यशाळा होत असून त्यासाठी योगेश राऊत यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वास वाढला असल्याचे वंदना महाजन म्हणाल्या. सजय रहाटे यांनी देखील योगेश राऊत यांच्या कार्याचे कौतुक केले.
संयोजन व प्रशिक्षक योगेश राऊत यांच्या मार्गदर्शनात झालेल्या या कार्यशाळेला अरुणा चौधरी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. मुलांना अभिनय, संवादफेक, आवाजावर नियंत्रण, कथाकथन, लेखन अशा विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यशाळेतील मुलांनी ‘स्वच्छता’ विषयावर नाटक सादर केले. सूत्रसंचालन बिपाशा गजवानी यांनी तर आभार प्रदर्शन अलका वाघमारे यांनी केले.