वैदर्भीय लेखकांचे लेखन साहित्य समृद्ध करणारे

0

 : प्रा. अविनाश कोल्हे (Prof. Avinash Kolhe)

डॉक्टर कलामांसोबत नारायण सुर्वेंचा देखील वाढदिवस एकत्रितपणे साजरा व्हावा

नागपूर (Nagpur) : विविध वैदर्भीय लेखक जसे वामन कृष्ण चोरघडे, यशवंत मनोहर, , कवी ग्रेस यांचे विपुल लेखन हे साहित्य समृद्ध करणारे असल्याचे सांगत आपल्या वाचन प्रवासात याचे भरीव योगदान असल्याचे प्रतिपादन प्रा. अविनाश कोल्हे यांनी केले.

वाचन प्रेरणा दिनानिमित्त वि. सा. संघ, जिल्हाधिकारी कार्यालय आणि भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने त्यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले . यात ‘विदर्भ, माझ्या मातीतील लेखक आणि माझा वाचन प्रवास’ या विषयावर मुंबईचे प्रसिद्ध व्याख्याते प्रा. अविनाश कोल्हे यांनी आपल्या अनोख्या शैलीत अभ्यासपूर्ण व्याख्यान केले. त्यावेळी ते बोलत होते. दरम्यान डॉक्टर कलामांसोबत साहित्यिक नारायण सुर्वेंचा देखील वाढदिवस एकत्रितपणे साजरा व्हावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. नारायण सुर्वें यांचे योगदान भरीव असून त्यांचा आठव या माध्यमाने व्हावा असे ते म्हणाले.

त्यांनी पुढे बोलताना संगीतले की आपल्या वाचन प्रवासाची सुरुवात खामगावच्या दस्तुरे लायब्ररी पासून झाली. लायब्ररीचे कामअधिकृत बंद झाले होते तरीही आपण आत बसून पुस्तक वाचण्याचा आनंद घेतल्याचं कोल्हे म्हणले. आपलं पहिलं वाचन इंग्रजी कॉमिक्स असलं तरीही त्यामुळे आपली कल्पनाशक्ती अफाट झाली त्यातून पुढे वर्णभेद आणि वंशभेदाची जाणीव झाली असं ते म्हणाले. प्रत्येक साहित्याला संस्कृतीचा अस्तर असतं त्यामुळे संस्कृती कळणं महत्त्वाचं हे लक्षात आलं. बायबल वाचण्याचा सल्ला गुरूंनी दिला. इंग्रजी संस्कृतीचा पाया समजायला इंग्रजी साहित्य वाचायला या मुळे अर्थ मिळणार होता.

खामगावच्या शाळेत सातवी मध्ये वाचनाची गोडी लागलीआणि वामन चोरघडे यांची ‘सलमा’, मुक्तीबोध आणि मनोहर यांचे साहित्य आपल्या वचन प्रवासाला अधिकअधिक समृद्ध करत होते. शब्दांचा वापर, शैली, इत्यादि यातून कळू लागल्याचे ते म्हणाले. याशिवाय आलं फर्ग्युसन महाविद्यालयातील शिक्षण आणि समांतर वाचन या बद्दल ते बोलले. केशवसुत आणि मनोहर यांच्या बंदतील फरक आपल्याला वाचनाने काळाला असे सांगून त्यांनी अनेक वैदर्भीय लेखक आणि कवींच्या लेखनातील निवडक ओळी आणि संवाद वाचून दाखवले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वृषाली देशपांडे यांनी केले तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वि सा संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते होते. यावेळी लेखक अनुवादक प्रफुल्ल शिलेदार , ज्येष्ठ पत्रकार प्रकाश एदलाबादकर यांची उपस्थिती होती.