

नागपूर (Nagpur), 19 सप्टेंबर, 2024 – इंजिनिअर्स फोरम तर्फे शुक्रवार, 20 सप्टेंबर 2024 रोजी संध्याकाळी 6 वाजता वनामती, ट्रॅफिक पार्कजवळ, वाय-पॉइंट, व्हीआयपी रोड, धरमपेठ, नागपूर येथे ‘अभियंता दिन’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. “स्वदेशीकरण आणि नवोन्मेषाची वाटचाल स्वावलंबनाकडे: आत्मनिर्भर भारत”, ही या वर्षीची मध्यवर्ती संकल्पना आहे.
संरक्षण मंत्रालय (नौदल), नवी दिल्ली येथील इंटिग्रेटेड हेडकॉर्टरचे चिफ ऑफ मटेरियल (पीव्हीएसएम, एव्हीएसएम, व्हीएसएम) निवृत्त व्हाईस ॲडमिरल अशोक व्ही. सुभेदार सन्माननीय अतिथी राहतील. अध्यक्षस्थानी संरक्षण मंत्रालय, भारत सरकार अंतर्गत येणाऱ्या यंत्र इंडिया लिमिटेडचे सीएमडी गुरुदत्ता राय तर प्रमुख पाहुणे म्हणून सार्वजनिक बांधकाम विभाग महाराष्ट्राचे माजी सचिव अभियंते उल्हास देबडवार राहणार आहेत. कार्यक्रमाला अभियंत्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.