

मुंबई(Mumbai), 01 जून चेन्नईहून मुंबईला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाला बॉम्बची धमकी दिल्यानंतर गोंधळ उडाला. मिळालेल्या माहितीनुसार, 6ई-5314 विमानाच्या क्रूला टॉयलेटमध्ये एक चिठ्ठी सापडली होती, ज्यामध्ये विमानात बॉम्ब असल्याचे लिहिले होते. यानंतर 9.15 वाजेच्या सुमारास मुंबई विमानतळावर विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आणि सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आणि त्यांना आयसोलेशनमध्ये पाठवण्यात आले. लँडिंगनंतर विमानाची तपासणी करण्यात आली. आठवडाभरात विमानाला बॉम्बची धमकी देण्याची ही तिसरी वेळ आहे.
यापूर्वी दिल्लीत इंडिगो विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली होती. येथेही टॉयलेटमध्येच टिश्यू पेपरवर लिहिलेली चिठ्ठी आढळून आली. त्यात ’30 मिनिटांत बॉम्बस्फोट’ असे म्हटले होते. तसेच 28 मे रोजी दिल्लीहून वाराणसीला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाला बॉम्बची धमकी देण्यात आली होती. यानंतर 176 प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आणि सहा क्रू मेंबर्सना ड्युटीवरून काढून टाकण्यात आले. तसेच विस्तारा एअरलाईन्सच्या विमानाता बॉम्बने उडवण्याची धमकी देणारा फोन श्रीनगर विमानतळावर करण्यात आला होता. त्यानंतरही विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले होते.