देशात आणीबाणी सुरू-खा सुप्रिया सुळे

0

 

पुणे- आम्ही महागाई, कांद्याला भाव , पार्लामेंन्टमध्ये झालेला हल्ला या विषयी चर्चा मागतली तर आमचं निलंबन झालं. लोकशाही राहिली नाही,आणीबाणी सुरू झाली आहे या देशात अशी संतप्त प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली आहे.
मराठा आरक्षण संदर्भात बोलतानाआधीच्या सरकार पेक्षा आताच्या सरकारने काही वेगळं केलं नाही. राम मंदीराच्या उद्घाटनाचे आम्हाला निमंत्रण आलेलं नाही.
बारामतीची जागा यावर बोलताना माझ्यासाठी ही लोकशाही आहे, दडपशाही दिल्लीत चालते
.जसं आता त्यांनी आमचं निलंबन केलं. एवढा मोठा ड्रग्ज माफिया पुण्यात सापडला, यावर राज्याचे गृहमंत्री म्हणाले होते की आम्ही सगळं याबाबत एक्सपोझ करु, आम्ही गृहमंत्र्यांना यात पाठिंबा देणार असं जाहिर केलं होतं मात्र,चौकशीत पुढे काय झालं, रात गयी बात गयी.. एवढा मोठा विषय गृहमंत्र्यानी अर्धवट सोडून चालणार नाही यावर खा सुप्रिया सुळे यांनी भर दिला.