

आमदार, खासदारांविरोधात आदिवासी आरक्षण बचाव कृती समितीचा एल्गार
(Amravti)अमरावती – अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर सुरू असलेल्या आदिवासी आरक्षण बचाव कृती समितीच्या आंदोलनाला आज पाचव्या दिवशी आदिवासी युवक क्रांती दलाच्या वतीने पाठिंबा देण्यात आला. कोळी समाजाने आदिवासी जमातीचे जात प्रमाणपत्र मागितले असून केवळ नामसदृश्याचा फायदा घेऊन त्यांचे हे आंदोलन सुरू असल्याचा आरोप करून त्याविरोधात हे आंदोलन असल्याचे सांगण्यात आले. कोळी समाज आदिवासी असल्याचे सांगून राजकीय दबाव टाकत आदिवासी समाजाला टार्गेट करत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.
यासह डी लिस्टिंगच्या सरकारच्या धोरणा विरोधातही यावेळी कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. यापुढे आमदार, खासदारांविरोधात धोरणात्मक आंदोलन करण्यात येणार, अशी प्रतिक्रिया अर्जुन युनाते, उपोषणकर्ता यांनी दिली