

मुख्यमंत्र्यांनी मानले विरोधकांचेही आभार
राम शिंदे यांनी आपल्या पदाचा कारभार स्वीकारला
नागपूर: नागपूरमध्ये सध्या अधिवेशन सुरू असून विधानपरिषदेला सुरूवात झालीये. विधानपरिषद सभापतीपदाचा प्रस्ताव ठेवण्यात आला. राम शिंदे यांची सभापतीपदी निवड व्हावी असा प्रस्ताव ठेवण्यात आला. यावेळी बहुमताने राम शिंदे यांची सभापती म्हणून निवड झाली. राम शिंदे यांनी आपल्या पदाचा कारभार स्वीकारला आहे.
शिवसेना नेत्या आमदार निलम गोऱ्हे या विधानपरिषदेच्या सभापती पदासाठी इच्छुक होत्या. विधानपरिषदेचे सभापतीपद आपल्याला मिळावे, यासाठी शिवसेनेने जोरदार प्रयत्न केले होते. मात्र विधान परिषदेतील संख्याबळामुळे भाजपने स्वत:कडे सभापतीपद ठेवत शिवसेनेला धक्का दिला आहे. विधानपरिषदेच्या सभापतीपदासाठी भाजपमधून राम शिंदे आणि प्रवीण दरेकर यांच्या नावाची चर्चा रंगली होती. मात्र भाजपकडून राम शिंदे यांना संधी देण्यात आली. राम शिंदे यांची सभापती म्हणून निवड करण्यात आलीये. विशेष म्हणजे राम शिंदे यांची बिनविरोध निवड झालीये. महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती म्हणून निवड करण्यात आल्याचे नीलम गोऱ्हे यांनी जाहीर केले. यानंतर राम शिंदे यांच्याबद्दल परिचय देताना निलिमा गोऱ्हे या दिसल्या. राम शिंदे यांची विधान परिषदेत आवाजी मतदानाने एकमताने निवड करण्यात आली आहे. यानंतर नीलिमा गोऱ्हे यांनी सभागृहात घोषणा केली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रामराजे निंबाळकर यांचा कार्यकाळ संपल्यानंतर ७ जुलै २०२२ पासून विधानपरिषदेचे सभापतीपद रिक्त आहे. या पदासाठी आज निवड प्रक्रिया पार पडली. राम शिंदे यांनी काल विधानपरिषदेच्या सभापतीपदासाठी अर्ज दाखल केला. या पदासाठी अर्ज करण्यासाठी १८ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत मुदत देण्यात आली होती. तर सभापतीपदासाठी १९ डिसेंबर रोजी निवडणूक होईल असे सांगण्यात आले होते. त्यानुसार, विधानपरिषदेचे सभापतीपदासाठी फक्त राम शिंदे यांचा अर्ज दाखल झाला होता. यामुळे भाजप नेते राम शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.