


जळगाव : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केलेल्या टीकेवर मंत्री गिरीश महाजन यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
एकनाथ खडसे यांना त्यांचा चष्मा बदलावा लागेल. विरोधक म्हणून त्यांनी बोलले पाहिजे. ते बोलले नाहीत तर त्यांचं दुकान चालणार नाही . त्यामुळे त्यांना ते करावच लागणार आहे. एकनाथ खडसे यांनी आज पत्रकार परिषदेत मंत्री गिरीश महाजन यांच्यावर टीका केली होती. पाच वर्षांपूर्वी निवडणुकांच्या वेळी मंत्री गिरीश महाजन यांनी जळगाव शहर चकाचक करून दाखवण्याचा निर्धार केला होता. मात्र प्रत्यक्षात जळगाव शहर हे घाणेरडे करून ठेवलं अशी टीका खडसेंनी गिरीश महाजन यांच्यावर केली होती. यावर मंत्री गिरीश महाजन यांनी प्रत्युत्तर दिले आहे.